
मराठी भाषेच्या संरक्षणासाठी आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी एकत्र येण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी फोनवर चर्चा केली असून, मराठीच्या मुद्द्यावर दोन स्वतंत्र मोर्चे आयोजित करण्याऐवजी एकत्रित आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या ५ तारखेला हे संयुक्त आंदोलन होणार असून, हा विषय महाराष्ट्राच्या जनतेसाठी किती महत्त्वाचा आहे, याचा संदेश यातून दिला जाणार आहे.