Raj Thackeray: गेल्या १८ वर्षात मनसेच्या इंजिनाचे तब्बल इतक्या वेळा बदलला ट्र्रॅक! वाचा सविस्तर

दीड ते सव्वादोन टक्के मतांचे धनी असलेल्या राज ठाकरे यांच्या बिनशर्त पाठिंब्याचा भाजपला किती उपयोग होईल, याबाबतही राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त होत आहे| Doubts are also being expressed in the political circles about how much the BJP will benefit from the unconditional support of Raj Thackeray, who has 1.5 to 1.52 percent votes.
Raj Thackeray: गेल्या १८ वर्षात मनसेच्या इंजिनाचे तब्बल इतक्या वेळा बदलला ट्र्रॅक! वाचा सविस्तर

विजय चोरमारे/सकाळ न्यूज नेटवर्क

Mumbai News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) अठरा वर्षांच्या प्रवासात मनसेच्या इंजिनाची दिशा एकवेळ बदलण्यात आली, परंतु इंजिनाने सहा वेळा ट्रॅक बदलला आहे. भूमिकेतील सातत्याचा अभाव आणि संघटनात्मक बांधणीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे निवडणुकीच्या राजकारणात मनसेची वाताहत झालेली पाहावयास मिळते. दीड ते सव्वादोन टक्के मतांचे धनी असलेल्या राज ठाकरे यांच्या बिनशर्त पाठिंब्याचा भाजपला किती उपयोग होईल, याबाबतही राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त होत आहे.(Mns Latest News )

राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केल्यानंतर प्रारंभीच्या काळात मुंबईसह राज्यभरात त्यांची हवा होती.पक्ष स्थापनेनंतर २००९ मध्ये मनसेला पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जावे लागले. आधी लोकसभा आणि पाठोपाठ विधानसभा अशा दोन्ही निवडणुका मनसेने स्वबळावर लढवल्या आणि त्यात त्यांना मतदारांकडून चांगला प्रतिसादही मिळाला.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने अकरा उमेदवार उभे केले होते. मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही, पण दक्षिण मुंबईत बाळा नांदगावकर यांना २४.९ टक्के, नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना ३३ टक्के, ईशान्य मुंबईत शिशिर शिंदे यांना २९.२ टक्के अशी लक्षणीय मते मिळाली होती. अन्य उमेदवारांनाही १७ ते १९ टक्क्यांच्या आसपास मते मिळाली होती. एकूण मतांमध्ये मनसेच्या मतांचा त्यावेळचा वाटा ४.१ टक्के होता. पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने १४३ जागा लढवल्या आणि त्यापैकी १३ जागा निवडून आल्या. मतांची टक्केवारी होती ५.७२.(MNS fielded eleven candidates in 2009 Lok Sabha elections)

लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीच्या आधी भाजप नेते नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन मनसेने निवडणूक लढवू नये, अशी विनंती केली होती. परंतु मनसेने ही निवडणूक लढवली आणि आपले खासदार लोकसभेत नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील, असे जाहीर केले. २०१४ मध्ये मनसेने दहा जागा लढवल्या, परंतु सर्व उमेदवारांची अनामत जप्त होण्याची नामुष्की ओढवली.

दक्षिण मुंबईत २००९ मध्ये २४.९ टक्के मते घेणा-या बाळा नांदगावकरांनाही केवळ अकरा टक्के मते मिळाली, यावरून मनसेच्या घसरलेल्या लोकप्रियतेची कल्पना यावी. कल्याणमध्ये पंधरा टक्के मते मिळाली, इतरत्र उमेदवारांना मिळालेली मते होती अडीच ते दहा टक्क्यांपर्यंत. मनसेला मिळालेल्या एकूण मतांचे प्रमाण २००९च्या ४.१ टक्क्यांवरून अवघ्या दीड टक्क्यांवर आले.(Mns got Fifteen percent votes were received in Kalyan)

लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर मनसे आणि राज ठाकरे यांच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले, तेव्हा कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी त्यांनी ‘मला तुमच्याशी बोलायचंय’ म्हणत कार्यकर्त्यांना साद घातली. त्यावेळी मुंबईत घेतलेल्या सभेत त्यांनी आपण स्वतः विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.

ठाकरे कुटुंबातील कुणीतरी व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा झाल्यामुळे त्याची चर्चा सुरू झाली. परंतु काही दिवसांतच राज ठाकरे यांनी ‘निवडणूक लढवणे आपल्या डीएनए मध्ये नसल्याचे’ सांगून निवडणूक लढवण्याच्या घोषणेवरून घुमजाव केले. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने २१९ जागा लढवल्या, परंतु फक्त एका जागेवर विजय मिळवला.(MNS contested 219 seats in 2014 assembly elections)

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने एकही उमेदवार उभा केला नाही, परंतु त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सभा घेतल्या. ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत घेतलेल्या या सभांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी चांगली वातावरणनिर्मिती केली, परंतु प्रत्यक्षात आघाडीला त्याचा फायदा झाला नाही. (lav re to video raj thackeray)

२०१९च्या विधानसभा निवडणुकीला मनसेने १०१ उमेदवार उभे केले, परंतु कल्याणमधून राजू पाटील हे एकमेव उमेदवार विजयी झाले. विधानसभेनंतर महाविकास आघाडी साकारताना काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला सोबत घेतल्यामुळे राज ठाकरे नाराज झाले आणि त्यांनी पुन्हा हळुहळू भाजपच्या दिशेने वाटचाल सुरू केली. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा ही त्याची अंतिम फलनिष्पत्ती.(MNS fielded 101 candidates for the 2019 assembly elections)

मनसेची राजकीय वाटचाल (how mns raj thackeray changed his political stand full list )

२००९ – स्वबळावर

२०१४ – भाजपला पाठिंबा

२०१४ – विधानसभा लढवण्याचा राज ठाकरे यांचा निर्णय

२०१४ – निवडणूक लढवण्याच्या निर्णयापासून माघार

२०१९ – भाजपच्या विरोधात ‘लाव रे तो व्हिडिओ’

२०२४ – नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा

विधानसभा निवडणुकीत मनसेला मिळालेली मते

२००९ – ५.७१ टक्के

२०१४ – ३.१५ टक्के

२०१९ – २.२५ टक्के

लोकसभा निवडणुकीत मनसेला मिळालेली मते

२००९ – ४.१

२०१४- १.५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com