esakal | मेट्रोच मराठी माणसाचा घात करेल - राज ठाकरे 
sakal

बोलून बातमी शोधा

 मेट्रोच मराठी माणसाचा घात करेल - राज ठाकरे 

मेट्रोच मराठी माणसाचा घात करेल - राज ठाकरे 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

प्रभादेवीतल्या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारवर घणाघात केलाय. मेट्रोच मराठी माणसाचा घात करेल असं राज ठाकरेंनी म्हंटलय. तसच महाराष्ट्रातच पेट्रोल, डिझेल महाग का? असा सवालही राज ठाकरेंनी केलाय.देशावर आलेल्या मंदीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसेल, हे अतिशय धक्कादायक असल्याचंही राज ठाकरेंनी म्हंटलंय. 

राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे : 

  • मुंबईतीलखड्डे कायम असेच राहणार, कारण कंत्राटदार आणि सत्ताधारी यांच्यातील टक्केवारी संपणार नाही.
  • आरेसाठी मी स्वतः मुंबई पोर्ट ट्रस्ट ची जागा सुचवली होती. आरेतील २७०० झाडं रातोरात मेट्रो कारशेडच्या नावाखाली कापून टाकली.
  • रातोरात झाडांची कत्तल झाली तेंव्हा माथेफिरु रमण राघव आठवत होता.
  • उद्योगधंदे कुठे जातायत ? BPCL सारखी नफ्यातील कंपनी रिलायन्सला विकण्याचा घाट घातला जातोय.
  • भारत रशियाच्या वाटेवर जातोय. तिथे आख्खा देश फक्त १५ ते २० उद्योपतींच्या हातात आहे.
  • मुंबईतील मराठी पट्ट्यातील पट्ट्यातील मराठी भाषा लोप पावतेय 
  • महाराष्ट्र सरकारच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण बोर्डाने आज शिक्षणक्रमातून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरचा धडा काढून टाकला


मुंबईतून देशाला सर्वाधिक टॅक्स हा मुंबईतू मिळतो. शिवसेना भाजपाने 2014 मध्ये रस्ते टोलमुक्त करू असं आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं ? असा सवालही राज ठाकरे यांनी माहीम मधल्या सभेत म्हटलं.     

WebTitle : raj thackeray claims mumbai metro is harmful for marathi manus of city