
‘कारभार ऐसा करावा की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागू नये’
आज काही भाषण करणार नाही. व्यासपीठावर फक्त दर्शन घ्यायला आलो आहे. कारण, खालून दर्शन घेता येत नाही. निवडणूक कधीही लागू शकते. मात्र, या वातावरणात निवडणूक वाटत नही, असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. प्रभादेवीमधल्या मनसेच्या शाखेच्या उदघाटन कार्यक्रामात ते बोलत होते.
महानगरपालिकांच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. यामुळे सर्वच पक्ष आपापल्या तयारीला लागले आहेत. मनसेकडून देखील शहरातल्या वेगवेगळ्या भागात शाखांची उदघाटने केली जात आहेत. राज ठाकरे यांनी घाटकोपरला शाखेचे उदघाटन करून त्याची सुरुवात केली होती.
आज काही भाषण करणार नाही. मी सभा घेणार आहे. तेव्हा इथेही घेईन. ही शाखा आहे. दुकान नाही. इथे आल्यावर न्याय मिळायला हवा. एक पाटी सगळ्या शाखेला मी देणार आहे. तीच पाटी प्रत्येक मंत्र्याला पाठवणार आणि ते लावायला सांगणार आहे, असेही राज ठाकरे (Raj thackeray) म्हणाले.
शिव छत्रपतींचा संदेश आहे, मंत्रालयातल्या सगळ्या भागात पाठवणार आहे. ‘कारभार ऐसा करवा की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागू नये’ या संदेशाचा प्रत्येक जण तंतोतंत पालन करेल अशी अपेक्षा राज ठाकरेंनी (Raj thackeray) व्यक्त केली.