
सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस त्यांच्या घोषणेची वाट पाहत आहे. अशातच आता राज ठाकरेंनी एक पत्र लिहिलं आहे. त्यांनी मनसैनिकांना यातून एक भावनिक आवाहन केले आहे. त्यांनी अधिकृत ट्विटरवर हे पत्र शेअर केले आहे. याची आता चर्चा होत आहे.