esakal | मनसेचा आणखी एक दणका; डॉमिनोज नरमलं, डॉमिनोज मराठी अँप सुरू करणार
sakal

बोलून बातमी शोधा

मनसेचा आणखी एक दणका; डॉमिनोज नरमलं, डॉमिनोज मराठी अँप सुरू करणार

मनसेच्या दणक्यानंतर डॉमिनोज पिझ्झा नरमलं असून लवकरच मराठीत अँप सुरु करणार आहे.

मनसेचा आणखी एक दणका; डॉमिनोज नरमलं, डॉमिनोज मराठी अँप सुरू करणार

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अॅमेझॉननंतर डॉमिनोजला दणका देण्याचं ठरवलं आहे. मराठीत व्यवहार करण्याच्या मुद्द्यावरुन मनसेनं आपला मोर्चा आता डॉमिनोजच्या दिशेनं वळवला. मात्र मनसेच्या दणक्यानंतर डॉमिनोज पिझ्झा नरमलं असून लवकरच मराठीत अँप सुरु करणार आहे. डॉमिनोज हे पिझ्झासाठी प्रसिद्ध आहे. डॉमिनोजच्या अॅप्लिकेशनवर मराठी भाषा उपलब्ध नाही आहे. त्यामुळे अॅप्लिकेशनवर मराठीचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी मनसेनं केली आहे. 

डॉमिनोजनं मनसेला पत्र पाठवून आश्वासन दिलं की, डॉमिनोजच्या प्रशासनाने या मागणीची दखलही घेतली असून आम्ही लवकरच अ‍ॅप्लिकेशनवर मराठी भाषा उपलब्ध करुन देऊ. 

डॉमिनोज मराठी अँप सुरू करणार

अमेझॉन, स्वीगी , झोमॅटो नंतर आता डोमिनोजच्या जुबिलियन्ट फूड वर्क कंपनीने देखील आपल्या अँप मध्ये मराठी भाषा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे .मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पिझ्झा डॉमिनोजला पत्र देणारे मनसे उपाध्यक्ष मूनाफ ठाकूर यांना पत्र देऊन आपण मराठीत अप्लिकेशन सुरू करणार असल्याचं सांगितलं.

हेही वाचा- New Year 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं राज्यातल्या जनतेसाठी खुलं पत्र

अॅमेझॉनविरुद्ध मनसे वाद 

काही दिवसांपूर्वीच मनसेनं अॅमेझॉनच्या वेबसाईटवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी आंदोलनं केलं होतं. त्यासाठी मनसेनं मोहिम राबवली होती. त्या मोहिमेला आक्रमक स्वरुप निर्माण झाले होते. मनसेकडून मुंबईत अ‍ॅमेझॉनविरोधात बॅनर लावण्यात आले होते. त्या बॅनरवर नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन असा मजकूर लिहिण्यात आला होता. मात्र अ‍ॅमेझॉनने याविरोधात न्यायालयात धाव घेऊन राज ठाकरे यांना नोटीस पाठवली. त्यामुळे मनसे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील मुंबई, पुणे आणि औरंगाबादमध्ये अॅमेझॉनची कार्यालये आणि गोदांमची तोडफोड केली. मात्र त्यानंतर मनसेनं केलेल्या खळखट्याकनंतर अॅमेझॉनही नरमली आणि त्यांनी सात दिवसांत अॅमेझॉनच्या वेबसाईटवर मराठी भाषेचा समावेश करण्याचं आश्वासनं दिलं.

Raj thackeray MNS After Amazon dominos pizza Marathi Language Option App

loading image