..आणि राज ठाकरेंनी 'त्याला' दिली स्वतःची खुर्ची

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 October 2019

कल्याण ग्रामीणमधून निवडून आलेले आमदार राजू पाटील यांना राज ठाकरेंनी आपल्या खुर्चीवर बसण्यास सांगितलं. मात्र याला राजू पाटील यांनी नकार दिला. 

मनसेच्या एकमेव आमदाराचा आज कृष्णकुंजवर सत्कार करण्यात आला. यावेळी पराभूत उमेदवारांचंही कौतुक राज ठाकरेंनी केलं. कृष्णकुंजवर राज ठाकरेंना भेटण्यासाठी आज सगळे आमदार कृष्णकुंजवर आले. त्यावेळी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला यांना सगळ्यांना ओवाळलं.

कल्याण ग्रामीणमधून निवडून आलेले आमदार राजू पाटील यांना राज ठाकरेंनी आपल्या खुर्चीवर बसण्यास सांगितलं. मात्र याला राजू पाटील यांनी नकार दिला. 

यानंतर राजू पाटील यांचा राज ठाकरेंनी सत्कार केला आणि पाठीवर कौतुकाची थाप दिली. मनसेचे राजीव पाटील यांचा मोठा विजय झालय. त्यांनी शिवसेनेच्या रमेश म्हात्रेंना पराभूत केलंय. 

कल्याण ग्रामीण मतदारसंघातील मनसेचे एकमेव आमदार राजीव पाटील राज ठाकरेंना भेटण्यासाठी आलेत. कृष्णकुंज या निवासस्थानी ही भेट होणारे. राज ठाकरेंच्या झंजावाती प्रचारानंतरही मनसेचा एकच उमेदवार निवडून आलाय. मतदार राजाने मनसेच्या उमेदवारांना नाकरल्याचे या निकालावरून स्पष्ट होतंय.

आणखी बातम्या वाचा :

मनसेचे 'इंजिन' पुन्हा सुरु; वाचा किती आमदार आले निवडून!

अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंना फोन; काय बोलले अमित शाह ?

WebTitle : raj thackeray offered him his own seat know full details


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raj thackeray offered him his own seat know full details