लतादीदी, तुमची इच्छाशक्ती अन् हिंदुस्थानीयांच्या प्रार्थनेचं बळ मोठं : राज ठाकरे

Raj Thackeray prays for Lata Mangeshkar on twitter
Raj Thackeray prays for Lata Mangeshkar on twitter

मुंबई : मागील दोन दिवस गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या तब्येतीसाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे. त्या लवकर बऱ्या व्हाव्या यासाठी देवाकडे लोक साकडं घालत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लतादीदींची प्रकृती सुधारणेबाबात सदिच्छा व्यक्त केली आहे. 

ठाकरे व मंगेशकर कुटूंबाचे जुने संबंध आहेत. राज यांनी ट्विट करत म्हणले आहे की, 'दीदी, तुमच्यातली इच्छाशक्ती आणि तमाम हिंदुस्थानीयांच्या प्रार्थनेचं बळ इतकं मोठं आहे की ह्या आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी मनापासून प्रार्थना करतोय.' राज ठाकरे हे स्वतः एक कलाकार आहेत. राज व लतादीदींचा ऋणानुबंध पूर्वीपासूनचा आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीसाठी ठाकरे कुटूंबियही सदिच्छा व्यक्त करत आहेत.

90 वर्षीय लतादीदी यांना अद्यापही लाइफ सपोर्ट सिस्टीम म्हणजेच व्हेंटीलेटर ठेवण्यात आलं आहे. लता दीदी यांना हृदयातील जंतूसंसर्ग झालाय. असतातच लता दीदी यांना न्युमोनिया देखील झाला असल्याची माहिती आता समोर येतेय. म्हणूनच लता दीदींना ICU मधून अद्याप बाहेर काढण्यात येणार नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com