
Raj Thackeray: गणपतीची आरास म्हणून साकारला राज ठाकरेंच्या सभेचा देखावा !
Raj Thackeray: मुंबईसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान झाला आहे. आपल्या बाप्पाच्या सेवेमध्ये गणेश फक्त तल्लीन झाले आहेत. बाप्पासाठी विविध प्रकारच्या आरासं गणपती बाप्पाच्या भक्तांनी बाप्पासाठी घरी तयार केल्या आहेत.
यातच कल्याणमध्ये एका तरुणाने तर चक्क महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेतील आरास तयार केली आहे. ही आरास म्हणजे राज ठाकरे यांच्या सभेची प्रतिकृतीच म्हणावी लागेल. या आरासेची चर्चा संपूर्ण समाज माध्यमात होत आहे.
मराठी माणसाचा मुद्दा असू दे किंवा हिंदू सणांचा विषय असू दे आपला कडवट आणि प्रखर विचार नेहमीच राज ठाकरे आपल्या भाषणांमधून मांडत असतात. अशातच त्यांचा कल्याण मधील जबरा फॅन असलेला आणि कार्यकर्ता असलेला अमोल गव्हाणे यांने आपल्या लाडक्या बाप्पासाठी राज ठाकरेंतच्या सभेची प्रतिकृती असलेली आरासच साकारली आहे.
यावेळी भविष्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता यावी आणि मुख्यमंत्रीपदी राज ठाकरे बसावे असे साकडेही त्यांनी बाप्पाला घातले आहे.
नुकतीच त्याच्या निवासस्थानी जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यातील एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांनी भेट घेतली. यावेळी राजू पाटील यांनी त्याचे कौतुकही केले.