Raj Thackeray on Aurangabad: औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरावर राज ठाकरेंचं भाष्य; म्हणाले, अवशेष पुसणं...

औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामकरणाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySakal

मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामकरणाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. त्यामुळं आता या शहरांची नावं अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशीव असं झालं आहे. राज्य सरकारनं हा नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडं पाठवला होता. केंद्राच्या या निर्णयानंतर राज ठाकरे यांनी यावर भाष्य केलं आहे. (Raj Thackeray speaks on change of name of cities Aurangabad and Osmanabad)

Raj Thackeray
Aurangabad: नाव बदललं तरी उल्लेख 'औरंगाबादच' करावा लागेल; तांत्रिक बाजू समजून घ्या!

राज ठाकरे यांनी फेसबूक पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात, "औरंगाबादचं 'छत्रपती संभाजीनगर' आणि उस्मानाबादचं 'धाराशिव' करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला भारत सरकारनं मान्यता दिली आहे, त्याबद्दल भारत सरकारचं मन:पूर्वक आभार. परकीय आक्रमकांच्या संस्कृतीचं अवशेष पुसणं हेच खरं हिंदवी सुराज्य!"

शिवसेनेनं केली होती पहिल्यांदा मागणी

राज ठाकरे यांचा औरंगाबादच्या 'संभाजी नगर' या नामकरणाला पहिल्यापासून पाठिंबा होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा औरंगाबाद शहराचं नामांतर संभाजी नगर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर बरेच वर्षे शिवसेनेसाठी हा मुद्दा अजेंड्यावर राहिला त्यावर बरंच राजकारणही झालं. पण आता शिवसेनेची ही मागणी प्रत्यक्षात उतरली आहे.

फक्त शहरांचं नाव बदललं जिल्ह्यांचं कायम!

पण केंद्राच्या मंजुरी पत्रकानुसार, औरंगाबाद जिल्ह्याच्या मुख्यालयाचं नाव 'छत्रपती संभाजी नगर' करण्यात आलं आहे. पण औरंगाबाद जिल्ह्याचं नाव कायम राहणार आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्याच्या मुख्यालयाचं नाव 'धाराशीव' असं बदलण्यात आलं आहे. पण उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव कायम ठेवण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com