
मनसेप्रमुख राज ठाकरेंना आज शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा घेतला. यावेळी राज ठाकरेंनी भाषण केले आहे. यावेळी औरंगजेबाच्या कबरीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आपण अडकलोय औरंगजेबाची कबर तोडली पाहिजे का राखली पाहिजे या चर्चेत. आता कुठून आठवला औरंगजेब ? चित्रपट पाहिल्यावर हिंदुत्व आठवलं ? चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आठवतं ? हल्ली कोणीही विधानसभेत इतिहासावर बोलतात... माहिती तरी आहे का हे औरंगजेब प्रकरण ?