
मुंबईत लोकल दुर्घटनेत ६ प्रवाशांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून पुन्हा एकदा मुंबई लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. लोकलमधील गर्दी पाहता गाड्यांची संख्या वाढवावी अशी मागणी सातत्याने प्रवाशांमधून होत आहे. मात्र याकडे रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय. लोकल दुर्घटनेवर बोलताना राज ठाकरे यांनी हा प्रश्न फक्त रेल्वेपुरता मर्यादीत नसल्याचं म्हटलंय. शहरांचा विचका झाला असून टाउन प्लॅनिंग नावाची गोष्ट नसल्याचं ते म्हणाले.