Raj Thackeray : राज ठाकरेंची पावलं थेट सेनाभवनाकडे ; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray and Raj Thackeray

Raj Thackeray : राज ठाकरेंची पावलं थेट सेनाभवनाकडे ; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच...

मुंबई - फुट पडल्यामुळे शिवसेना अत्यंत कमकुवत झाली आहे. त्यातच शिवसेनेचं पहिलं नावही बदललं. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांचा संघर्ष सुरू झाला आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला मोर्चा शिवसेनेच्या बालेकिल्ल्याकडे वळवला आहे. (Raj Thackeray news in Marathi)

हेही वाचा: Chitra Wagh : 'एकट्या अध्यक्ष म्हणजे आयोग नसतो...बाष्कळ विधानं बंद करा'; वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर

राज ठाकरे लवकरच शिवसेना भवनासमोर सभा घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. नवीन वर्षातील पहिली सभा पुढील दहा दिवसात होण्याची शक्यता आहे. मात्र मनसेची तोफ शिवसेनाभवनासमोर धडकणार असल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. त्यांनी आधीच तीन सभा घेणार असल्याचं म्हटल होतं. त्यात दोन कोकणात आणि एक मुंबईत घेणार आहे. त्यामुळे पहिली मोठी सभा दादरमधील मिनाताई ठाकरे पुतळ्याच्या जवळ होणार आहे. याच रस्त्यावर शिवसेना भवन आहे. मात्र येथे परवानगी मिळाली नाही, तर दोन पर्याय आहेत. ते देखील शिवसेना भवनाजवळच आहे.

हेही वाचा: Narayan Rane : "उद्धव-रश्मी संजयला चपलेने मारतील"; राऊतांचं चॅलेंज राणेंनी स्विकारलं!

याबाबत संदीप देशपांडे म्हणाले की, राज ठाकरे यांनी २२ ते २३ तारखेला सभा घेण्याचं नियोजन आहे. मात्र अजुनही त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

राज ठाकरे यांच्यासमोर सभा घेण्यासाठी तीन पर्याय आहेत. दादरचं शिवाजी पार्क, सेनाभवनासमोर रस्ता आणि मिनाताई ठाकरे पुतळ्यासमोर सभा घेण्याचे पर्याय राज ठाकरे यांच्यासमोर आहेत.