अमितच्या लग्नाइतकाच या सोहळ्याचा आनंद: राज ठाकरे

MNS
MNS

पालघर : नुकतंच माझा मुलगा अमितचं लग्न झालं, या सोहळ्या इतकंच समाधान आणि आनंद आज अजून एका सोहळ्याने दिला, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेने पक्षातर्फे पालघर येथे आयोजित 500 आदिवासी जोडप्यांच्या सामूहिक लग्नसोहळा आयोजित केला होता. पालघर येथील बोईसर परिसरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीत आदिवासी तरुण तरुणींचा सामूहिक विवाह झाल्यानंतर राज ठाकरे यांनी ट्विट करत याबद्दल वक्तव्य केले आहे. 

राज ठाकरे यांनी ट्विट करत अमितच्या लग्नाइतकच आनंद झाल्याचे म्हणत याबद्दल पक्षाचे अविनाश जाधव, कुंदन संखे आणि महाराष्ट्र सैनिकांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांनी नव-दाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com