राज ठाकरे उद्या दिव्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

डोंबिवली - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्याला आलेले महत्त्व पाहता मनसेच्या प्रचारासाठी राज ठाकरे येणार आहेत. शहरात त्यांची जाहीरसभा होणार आहे. दिवा पूर्वेतील प्रेरणा टॉवरजवळील एका खासगी मैदानात बुधवारी संध्याकाळी ५.३० वाजता राज यांची सभा होईल, अशी माहिती मनसे सरचिटणीस राजू पाटील यांनी दिली.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शनिवारी (ता. ११) झालेल्या दिव्यातील सभेत मैदानावर साचलेले पाणी हा चर्चेचा विषय झाला होता. याची  पुनरावृत्ती मनसेच्या सभेत होऊ नये, यासाठी मनसे पदाधिकारी काळजी घेणार असल्याचे समजते. त्यामुळे बुधवारी राज आपल्या भाषणातून कोणावर तोफ डागतात, ते पाहावे लागेल. दिवा येथे प्रथमच राज यांची जाहीरसभा होत असल्याने त्याला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे. दिव्यात मनसेने चांगलेच बस्तान वसवले आहे. मध्यंतरी मनसेने नाशिकमधील विकास पहाण्यासाठी इथल्या उत्तर भारतीयांना नेण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या पाटण्याबाबतच्या वक्तव्यामुळे हा समुदाय भाजपवर काहीसा नाराज आहे.

Web Title: Raj Thackeray tomorrow in diva