राज ठाकरेंची वरळी कोळीवाड्याला भेट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

कोस्टल रोड संदर्भात स्थानिकांनी काही उपाय सुचवले आहे. त्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना भेटून राज ठाकरे समस्या मांडण्याची शक्यता आहे.

मुंबई : एकीकडे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे कोस्टल रोडचे उदघाटन करत असताना दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोस्टल रोड संदर्भात वरळी येथील कोळी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या.

आज (ता. 16) सकाळी 9 वाजता, राज ठाकरे यांनी वरळी कोळीवाड्यात भेट दिली. यावेळी स्थानिक मच्छीमारांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या.

कोस्टल रोड संदर्भात स्थानिकांनी काही उपाय सुचवले आहे. त्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना भेटून राज ठाकरे समस्या मांडण्याची शक्यता आहे.

Web Title: Raj Thackeray visit Worli Koli wada Mumbai