Raj Thackeray Warning on Mumbai BMC Election
esakal
मुंबई: ‘‘ सध्याचे राज्यातील राजकीय वातावरण दूषित झाले असून उत्तर प्रदेश-बिहार बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य असून त्याचे ‘यूपी-बिहार’ करणे थांबवावे,’’ असा इशारा राज ठाकरे यांनी रविवारी दिला. सत्तेचा अमरपट्टा कोणालाही मिळालेला नाही, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.