राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर आज आनंदाचा दिवस, जाणून घ्या कारण 

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 12 June 2020

  • राज ठाकरे यांच्या तीन सुरक्षा रक्षकांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.
  • मात्र सुदैवाने आता हे सुरक्षारक्षक कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती समोर येत आहे. 

 

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र कहर माजवला आहे. तसंच लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहे. सर्वाधिक प्रार्दुभाव असलेल्या मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींपर्यंतही कोरोनाची लागण झाली आहे. ठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्यांलाही करोनाचा संसर्ग झाला आहे. अशातच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना आज काहीसा दिलासा मिळाला आहे. राज ठाकरे यांच्या तीन सुरक्षा रक्षकांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र सुदैवाने आता हे सुरक्षारक्षक कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती समोर येत आहे. 

'निसर्ग'ग्रस्तांच्या मदत पॅकेजमध्ये अनेक त्रुटी; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर आरोप

समोर आलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या तिन्ही पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. हे तीन पोलिस कर्मचारी उपचारानंतर बरे होऊन आता कोरोनामुक्त झालेत.

राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांनी आवाहन 

राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी एक पत्र लिहिलं आहे. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत, असं आवाहन राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं आहे. 14 जून रोजी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये असं आवाहन कार्यकर्त्यांना त्यांनी पत्राद्वारे केलं. 

काय सांगता! 'पुलं'चं साहित्य आता त्यांच्याच हस्ताक्षरात वाचता येणार; ते कसे वाचा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज यांनी वाढदिवस साजरा करणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून आणि पदरमोड करून जनतेला मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांचं राज ठाकरे यांनी कौतुक केलं आहे. मला असे सहकारी मिळाले याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र ट्विटरवर शेअर केले आहे. तुमच्या भागातील नागरिकांना मदत करा त्याच माझ्यासाठी शुभेच्छा असतील असंही राज यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray's security guards are now free from corona infection