‘पॅंथर’ कालवश

Raja-Dhale
Raja-Dhale

मुंबई - दलित पॅंथरचे संस्थापक, मानवतावादी विचारवंत, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, बंडखोर लेखक राजा ढाले (वय ७८) यांचे आज सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील लढवय्या महानायक निमाल्याची शोकभावना व्यक्त होत आहे. उद्या (बुधवारी) दुपारी एक वाजता दादर चैत्यभूमी येथील विद्युतदाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्‍चात पत्नी दीक्षा, मुलगी गाथा, जावई, नातू असा परिवार आहे. 

राजा ढाले यांना मंगळवारी सकाळी विक्रोळीतील टागोरनगर येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटका आला. त्यांना गोदरेज रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. बुधवारी सकाळी दहा वाजता त्यांचे पार्थिव निवासस्थानी आणण्यात येईल. 

दलित पॅंथरमध्ये फूट पडल्यानंतर ते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिपमध्ये सक्रिय होते. त्यांनी १९९९ मध्ये भारिपचे उमेदवार म्हणून मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली; मात्र त्यांचा पराभव झाला. त्यांच्यामुळे आंबेडकरी चळवळीला भक्कम वैचारिक अधिष्ठान मिळाले.

काही काळापासून त्यांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी जवळिक होती. राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, रिपब्लिकन नेते राजा सरोदे आणि अन्य मान्यवरांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

बौद्ध तत्त्वज्ञानाकडे अधिक कल
राजा ढाले यांचा दलित पॅंथर या लढाऊ संघटनेच्या संस्थापकांमध्ये समावेश होता. वर्ग-वर्ण-जातविरहित समाजाच्या निर्मितीसाठी आणि अन्यायाच्या विरोधात त्यांनी लेखणी चालवली. त्यांचे साहित्य अत्यंत आक्रमक आणि तितकेच संयमी होते. 

‘साधना’ नियतकालिकातील त्यांच्या ‘काळा स्वातंत्र्यदिन’ या लेखाने खळबळ उडवून दिली होती. ‘तापसी’, ‘येरू’, ‘जातक’, ‘चक्रवर्ती’, ‘विद्रोह’ या नियतकालिकांतून त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी ‘धम्म लिपी’ हे नियतकालिक अनेक वर्षे चालवून बौद्ध तत्त्वज्ञानाची मांडणी केली. त्यांनी दलितांच्या व्यथा-वेदनांना वैचारिक अधिष्ठान दिले. बौद्ध धम्म आणि आंबेडकरी तत्त्वज्ञानाकडे त्यांचा अधिक कल होता. बौद्ध साहित्य आणि आंबेडकरी साहित्याचे ते गाढे अभ्यासक होते. आंबेडकरी आणि बौद्ध तत्त्वज्ञानासाठी त्यांनी आयुष्य वेचले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com