
मुंबई : द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) मे महिन्यात झालेल्या सीए (चार्टर्ड अकाउंट्स) च्या परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला. यात ऑल इंडिया रँकमध्ये छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा (८६ टक्के) हा देशात प्रथम आला आहे. कोलकता येथील निशिता बोथरा (८३.८३ टक्के) आणि मुंबईतील मानव शहा (८२.१७ टक्के) यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले आहे. या परीक्षेत १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले आहेत.