राजेश टोपे म्हणालेत, "दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलून 'मोठा' निर्णय घेणार"; महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजेश टोपे म्हणालेत, "दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलून 'मोठा' निर्णय घेणार"; महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ?

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुनःश्च लॉकडाऊन बाबत महत्त्वाचं विधान केलंय. सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात पुन्हा निर्बंध लावणार असल्याचं विधान केलंय.

राजेश टोपे म्हणालेत, "दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलून 'मोठा' निर्णय घेणार"; महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ?

मुंबई : कोरोनाचे आकडे दिवाळीनंतर पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळतायत. नियम पाळा आणि आम्हाला निर्बंध लावायला भाग पाडू नका असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. कोरोनाचं संकट अद्याप गेलेलं नाहीये हेही प्रशासनाने आतापर्यंत अनेकदा सांगितलं आहे. तरीही अनेकजण त्याला गंभीरपणे घेत नाहीत, अशात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या  त्सुनामीची भीती असल्याचा इशाराही दिला आहे.

याबाबत आज महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुनःश्च लॉकडाऊनबाबत महत्त्वाचं विधान केलंय. सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात पुन्हा निर्बंध लावणार असल्याचं अत्यंत महत्त्वाचं विधान केलंय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचीही तशीच इच्छा असल्याचंही ते म्हणालेत. 

महत्त्वाची बातमी : लोकलबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांचं 'महत्त्वाचं' विधान, सोबत 'मिनी' लॉकडाऊनचेही संकेत

दिवाळीनंतर कोरोना रुग्णांचे आकडे वाढते आहेत. आता डिसेंबरचा महिना येणार आहे, वातावरणात थंडी असणार आहे. मात्र नागरिक कुठेतरी निश्चिन्त झाल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान लोकांची "बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याने राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लावणार असल्याचं राजेश टोपे म्हणालेत. येत्या दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन राज्यातील शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येतील असं राजेश टोपे म्हणालेत. नागरिक सोशल डिस्टंसिंग पळत नसल्याने कठोर निर्णय घ्यावा लागणार असल्याचे राजेश टोपे म्हणालेत. 

महत्त्वाची बातमी :  कोरोना लसीबाबत उत्सुकता, भारत बायोटेकची लस घेण्यासाठी 300 जण उत्सुक

काय काय होऊ शकतं ? 

  • मुंबईतील उपनगरीय रेल्वे सर्वसामान्य नागरिकांसाठी तूर्तास सुरु केली जाणार नाही
  • सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यावर प्राधान्य राहील.
  • दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं आपण पाहिलंय. अशात सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांवर प्रतिबंध आणणार.  
  • समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे आणि चौपाट्यांवर होणारी मोठ्या प्रमाणातील गर्दी  नियंत्रणात आणणार. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणार. 
  • लग्न समारंभात २०० नागरिकांची संख्याही कमी करणार. पुन्हा केवळ ५० नागरिकांनाच हजर राहण्याची मुभा दिली जाऊ शकते. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सदर बाबींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असून येत्या दोन दिवसात मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. कोरोना नियंत्रणासाठी पुन्हा कठीण पावले उचलावी लागतील असंही राजेश टोपे म्हणालेत. 

rajesgh tope to meet CM uddhav thackeray big decision regarding lockdown might be taken

Web Title: Rajesgh Tope Meet Cm Uddhav Thackeray Big Decision Regarding Lockdown Might Be Taken

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top