लोकलबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांचं 'महत्त्वाचं' विधान, सोबत 'मिनी' लॉकडाऊनचेही संकेत

लोकलबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांचं 'महत्त्वाचं' विधान, सोबत 'मिनी' लॉकडाऊनचेही संकेत

मुंबई : दिवाळीनंतर मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना पाहायला मिळतोय. मुंबईत ५०० च्या  खाली आलेले दररोजचे कोरोना रुग्ण पुन्हा १ हजाराच्या वर गेलेत. अशात दिवाळी आधीपासूनच सर्वसामान्य नागरिकांसाठी मुंबईची लाईफलाईन म्हणजेच मुंबईतील लोकल ट्रेन कधी सुरु होणार याबाबत विचारणा सुरु होती. राज्य सरकारकडून देखील रेल्वेला सर्वसामान्य नागरिकांसाठी रेल्वे सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आलाय. मात्र, दिवाळीनंतरची मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता आता लगेच मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सुरू होणार नाही अशी चिन्ह आहेत. महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी मुंबईतील लोकलबाबत माध्यमांना माहिती दिली आणि सोबतच मुंबईत मिनी लॉकडाऊनचे संकेतही दिलेत. 

पुढील आठ दिवस महत्त्वाचे 

माध्यमांना माहिती देताना वडेट्टीवार म्हणालेत की, मुंबई ही इंटरनॅशनल सिटी आहे, मेट्रोपॉलिटन शहर आहे. अशात शहरात येणारा लोंढा इतर राज्यातून जास्त प्रमाणात येत असतो. एकीकडे देशात रुग्णसंख्या वाढतेय. अशात मुंबईतही भविष्यातील काळात ही परिस्थिती येऊ शकते असं सर्वांचं मत आहे. अशा परिस्थितीत काही निर्बंध लादले गेले पाहिजेत. मात्र पुढील आठ दिवसातील परिस्थिती लक्षात घेऊन, पुढील आठ दिवसात महाराष्ट्रातील रुग्णसंख्या किती टक्क्यांनी वाढतेय याचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाईल. 

लोकांचा जीव महत्त्वाचा आहे, गरज पडल्यास सर्व प्रकारचे निर्णय घावे लागतील 

आता सध्या पुणे, औरंगाबाद, नागपूर इथे रुग्णसंख्या वाढते आहे. मुंबईतही रुग्णसंख्या वाढायला सुरवात झाली आहे. रोजच्या आकडेवारीत, दररोजची रुग्णसंख्या वाढतेय. हा सर्व विचार करून पुढील पाच ते सहा दिवसात ही आकडेवारी किती कुठवर जातेय हे पाहून यावर पुढील निर्णय घ्यावे लागतील. गरज पडल्यास सर्व प्रकारचे निर्णय घ्यावे लागतील. मागच्या सारखी परिस्थिती उद्भवली तर सर्व प्रकारचे निर्णय घ्यावेच लागतील, कारण लोकांचा जीव महत्त्वाचा आहे, असंही वडेट्टीवार म्हणालेत.      

help and rehabilitation minister vijay wadettiwar gives signal of mini lockdown in mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com