
डोंबिवली : कल्याण शीळ रोडवरील नवीन पलावा पूल सुरु झाला नाही तोच पुलावर खड्डे पडल्याने चर्चीला गेला होता. पुलाची नव्याने डागडुजी केल्यावर पुन्हा पुलावर खड्डे पडू लागले आहेत. यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा सत्ताधारी शिवसेना शिंदे गटावर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली आहे. मनसे नेते राजू पाटील यांनी पलावा पुलावर गुणवत्तेचा खून असे म्हणत एक्स पोस्ट केली आहे.