esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Raju patil

टक्केवारीत सगळे अडकलेय, सत्ताधारीच वाघाचा वाटा खातात - राजू पाटील

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : खड्ड्यांवरून (potholes) पालकमंत्र्यांनी ठाणे येथे दोषी अधिकारी, कंत्राटदारवर (contractor) कारवाई करण्याचे आदेश दिले. कल्याण डोंबिवली (kalyan-dombivali), ग्रामीण भागातील रस्ते ठाणेपेक्षा वेगळे नाहीत. टक्केवारीत सगळे अडकले आहे, अधिकारी ठेकेदार यांच्यावर कारवाई करून होणार काय? असा सवाल उपस्थित करीत सत्ताधारी (Government) वाघाचा वाटा खात असून रस्त्यांची त्याचमुळे वाट लागली असल्याचा आरोप मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी सत्ताधारी शिवसेनेवर केला.

हेही वाचा: मुंबईत लेप्टोसह डेंग्यूचा धोका वाढला

कल्याण ग्रामीण भागातील चक्की नाका ते नेवाळी परिसरातील रस्त्यांची मनसे आमदार पाटील यांनी पालिका अधिकारी व कंत्राटदार यांच्या समवेत बुधवारी पहाणी केली. कल्याण मलंग रस्त्याची अवस्था दयनीय आहे.अनेक महिन्यांपासून रस्त्यांबाबत पाठपुरावा केला, मात्र प्रशासनाने लक्ष दिले नाही त्यामुळे आज पहाणी केली. या रस्त्यावर 45 कोटी खर्च झाला आहे. तरीही या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. 31 मे 2019 ला हा रस्ता पूर्ण होणे अपेक्षित होते. मुदतवाढ देऊनही काम पूर्ण झालेले नाही. या रस्त्याच्या कामाचे 95 टक्के बिल रेलकॉन या कंत्राटदार कंपनीला आधीच दिले गेले आहे. मुंबईत काळ्या यादीत आलेल्या कंपनीला इथली कामे दिल्यावर हीच परिस्थिती होणार असे ते म्हणाले.

कल्याण-मलंग रस्त्याची पालकमंत्र्यांनी वेळ काढून पहाणी करावी. आयुक्त तर कलेक्टर मोडमधून अद्याप आयुक्त मोडमध्ये आलेले नाहीत. ते कुठलीही कामे करीत नाहीत असे म्हणत त्यांनी आयुक्तांवरही निशाणा साधला. आठ वर्षात 114 कोटी खर्च झालाय तो दिसतो का ? सगळीकडे अडवणूक आणि फसवणूक सुरू आहे. ओरबडण्याचे काम सुरू आहे अस सांगत पाटील यांनी 15 दिवसांत खड्डे भरले नाही तर तुम्हालाच या खड्डयात भरू असा इशारा आमदारांनी पालिका अधिकारी आणि ठेकेदारांना दिला.

loading image
go to top