esakal | मुंबईत लेप्टोसह डेंग्यूचा धोका वाढला | Dengue
sakal

बोलून बातमी शोधा

dengue

मुंबईत लेप्टोसह डेंग्यूचा धोका वाढला

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत (Mumbai) सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. यातच आता मुंबईतील साथरोगाच्या आजारांमध्ये (infectious decease) ही वाढ झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबर महिन्याच्या साथरोगाचे प्रमाण वाढले असल्याचे पालिकेने (bmc) जाहिर केलेल्या आरोग्य अहवालातून (health report) स्पष्ट झाले आहे.  दरम्यान, मुंबईत लेप्टो आणि डेंग्यूचा धोका सर्वाधिक बळावला आहे. लेप्टोने मुंबईत आतापर्यंत चार जणांचा बळी घेतला असून डेंग्यमुळे (dengue deaths) 3 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत जानेवारी ते सप्टेंबर लेप्टोचे 165 रुग्ण आढळले. तर, डेंग्यूचे 9 महिन्यांत 418 रुग्ण सापडले आहेत.

हेही वाचा: माणगाव : रवाळजे पॉवर हाऊस कॅनल पाण्यात मृतदेह आढळल्याने खळबळ

मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सप्टेंबरमध्ये साथीच्या आणि संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. पण, ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत या महिनाभरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात डेंग्यू आणि लेप्टोमुळे मृत्यू झाले आहेत. यात 5 महिन्यांच्या मुलीचाही डेंग्युमुळे मृत्यू झाला आहे.

5 महिन्याची मुलगी एम पूर्व या प्रभागातील रहिवासी असून 26 ऑगस्ट रोजी तिचा तीव्र ताप आला. त्यानंतर तिला 27 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल केले. तीव्र झटक्याची तक्रारीची नोंद केल्यानंतर तिला तपासणीदरम्यान अॅनिमिया, कमी प्लेटलेट काउंट आणि डेंग्यू असल्याचे आढळून आले. रुग्णाची तब्येत वेगाने बिघडली आणि त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा: प्रकृतीच्या कारणास्तव शिवलीला पाटील 'बिग बॉस'च्या घराबाहेर

एच पूर्व मधील 18 वर्षीय मुलाला डेंग्यूची लागण झाली.  31 जुलै रोजी रुग्णाला श्वासोच्छवासाच्या तक्रारीसाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णाला दुसरी कोणतीही लक्षण नव्हती. तपासणीत रुग्णामध्ये प्लेटलेटची संख्या कमी आणि डेंग्यू एलिसा पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. उपचार करूनही रुग्णाची प्रकृती झपाट्याने खालावली. 1 ऑगस्ट 2021 रोजी त्याचा मृत्यू झाला. एच पूर्व मधील एका 17 वर्षीय मुलाचा लेप्टोस्पायरोसिसने मृत्यू झाला आहे.

तर, 44 वर्षीय महिलेचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. एफ एन वॉर्डमधील 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. 2 ऑगस्ट 2021 रोजी रुग्णाला खोकला आणि उलट्यासह तीव्र ताप होता. रुग्णाला स्थानिक डॉक्टरांद्वारे उपचार देण्यात आले. 5 ऑगस्टला रुग्णालयात दाखल केले गेले. त्याच्या निदर्शनातून त्याला लेप्टोस्पायरोसिस झाल्याचे आढळले.  6 ऑगस्टला त्याचा मृत्यू झाला. तर, के पूर्व वॉर्डातील 45 वर्षीय पुरुषाने लेप्टोमुळे जीव गमावला आहे. दरम्यान,  महापालिकेने नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

हेही वाचा: भांडूपच्या जंगलात सापडले नवजात अर्भक

ताप आल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या

श्वसनासंबंधी समस्या, उलटी, पोटात दुखणं, डोळे पिवळे होणे, नाक किंवा तोंडातून रक्त येणं अशी लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवा. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, कचरा, पाणी साचू देऊ नका. डास चावणार नाहीत याची काळजी घ्या.

9 महिन्यांची आकडेवारी

आजार रुग्ण मृत्यू

मलेरिया           3946     0

लेप्टो                    165 4

डेंग्यू       418   3

गॅस्ट्रो                 2081 0

हेपाटायटीस         191 0

चिकनगुनिया   5 0

एच1एन1 54 0

चिकनगुनियाचाही धोका

मुंबईत या वर्षी चिकनगुनियाचा ही धोका आहे. आतापर्यंत 5 चिकनगुनियाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. 2019 आणि 2020 मध्ये एकही चिकनगुनियाचा रुग्ण मुंबईत सापडला नव्हता. मात्र, यावर्षी सप्टेंबर महिन्यात 5 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

loading image
go to top