

Raju Patil criticism of BJP
ESakal
डोंबिवली : “भाजपाचं आगरी-कोळी-भूमिपुत्र प्रेम आणि समाजांवरील स्नेह फक्त निवडणुकीपुरताच मर्यादित आहे,” असा थेट घणाघात मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी केला आहे. नुकत्याच मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीचा फोटो शेअर करून त्यांनी भाजपच्या “सामाजिक प्रेमाचं राजकारण” असा उल्लेख करत टोला लगावला आहे.