
Dombivali Latest News: मराठी या विषयावर दोन्ही शिवसेना म्हणजे ही जी शिवसेनेतून फुटून निघालेली बांडगुळ आहेत ती शिवसेना व पूर्वीची शिवसेना यांनी बोलूच नये. दोपहर सामना काढणाऱ्यांनी मराठी व हिंदी या वादात पडू नये, त्यांना तो नैतिक अधिकार नाही. हे काम फक्त मनसे जोरात करत असून राज ठाकरे हा विषय कधी सोडणार नाही असे म्हणत मनसे नेते राजू पाटील यांनी मराठी व परप्रांतीय वादावरून शिवसेनेला लक्ष केले आहे.
कल्याण डोंबिवली मध्ये मराठी व परप्रांतीय वादाचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आला आहे. मराठी माणसांवर परप्रांतीयांची दादागिरी वाढत असल्याचे म्हणत मनसेने यावर आवाज उठविला आहे. मात्र शिवसेना पक्षातील नेते, पदाधिकारी यावर काही बोलताना दिसत नाही. यावर मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील म्हणाले, मराठी या विषयावर दोन्ही शिवसेनेने काही बोलूच नये.