Raju Patil : खरं इंजिन आमचं... आता गाडी स्पीड पकडेल; मनसे आमदारांच्या राजकीय कोपरखळ्या

Raju Patil : खरं इंजिन आमचं... आता गाडी स्पीड पकडेल; मनसे आमदारांच्या राजकीय कोपरखळ्या

Kalyan Loksabha: खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी माझी थोडी लुटपुट होती, तो राजकारणाचा एक भाग असतो. बात गयी ओ बीत गयी असे म्हणत खऱ्या मनाने येथे आलो आहे, शंका ठेवायची गरज नाही असा विश्वास मनसे आमदार राजू पाटील यांनी महायुतीला दिला. (raj thackeray with modi)

यावेळी हे बोलायचे ट्रिपल इंजिन सरकार आहे. पण खर इंजिन आमचं आहे. ते लागल्यामुळे नक्कीच गाडी स्पीड पकडेल अशी कोपरखळी मारत त्यांनी श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा हॅट्रिक मारतील असे म्हणत त्यांना शुभेच्छा दिल्या. (mns mla raju patil)

डोंबिवली येथे आयोजित खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवाल प्रकाशन समारंभ प्रसंगी आमदार राजू पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी महायुतीला राजकीय कोपरखळ्या मारल्याने, आमदार पाटील यांच्या भाषणाची चर्चा रंगली.(eknath shinde speech in kalyan loksabha)

आमदार पाटील म्हणाले, काही गोष्टी सांगू इच्छितो ,श्रीकांत शिंदे यांचा जो कार्य अहवाल दाखवला गेला. त्यांनी नक्कीच चांगली कामे केली आहेत. मी जेव्हा विधानसभेला उभा राहिलो, तेव्हा एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून इथे काम करेल असं बोलून उभं राहिलो होतो. आणि मी चॅलेंज देऊन सांगतो की खासदार शिंदे यांनी कल्याण ग्रामीण मध्ये जितका निधी दिला, तितका इतर कुठे दिलेला नाही.(mns with eknath shinde)

शिंदे यांनी चांगली काम केलीत त्याबद्दल काही शंका नाहीत. आमच्यात जे झालं किंवा आमच्यात लुटपुट असेल परंतु शिंदे यांच्याशी मी कधी लिंक तोडली नाही. तो आमच्या राजकारणाचा एक भाग होता प्रत्येकाने तो करायला पाहिजे. बात गयी वो बीत गयी...मी खऱ्या मनाने आज आम्ही इथे उपस्थित राहिलो आहोत त्यामुळे शंका घ्यायची गरज नाही की मनसे काम करेल की नाही असे आमदार पाटील म्हणाले. एकतर आमच्या समोर जे उमेदवार दिलेत ते दोन्ही आमचे पक्ष सोडून गेलेत. भिवंडी व कल्याण लोकसभा मतदारसंघ असेल त्यांची काम अशी ही आम्ही करणार नव्हतो. त्यामुळे तो काही विषय नाही.

मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला म्हणून आमच्यावर जे ओरडतात खरं तर आम्ही या निवडणुकीत कुठेच नाही. मोदीजी चांगलं काम करतात म्हणून चांगल्या हेतूने पाठिंबा दिलाय. समोर कोणीच नाही जेव्हा विरोध करायचा तेव्हा ठोकून विरोध केलेला आहे. मी जेव्हा निवडून आलो तेव्हा शिंदे यांचा फोन आलेला समर्थनाची वेळ आल्यावर समर्थन देणार का? अजित दादा यांचा देखील फोन आला त्यांनी तर मला पाठिंबा दिला होता, ठराव केला होता. त्यामुळे पाठिंबा देणार एकदा वरिष्ठांशी बोलून घ्या असे मी त्यांना सांगितले.

परंतु त्यावेळेस अशी काही वेळ आली नाही. शिंदे यांचे व माझे जे काही पक्षप्रमुख होते, त्या काही अडचणी होत्या. त्यांना राज यांना विचारण काही जमलं नाही. सेम गोष्ट 2014 ला झाली. ती जर घटना घडली असती तर आम्ही खासदरकीला उभे राहिले नसतो आमच्यात जे झाले ते झाले नसते असे आमदार पाटील म्हणताच त्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी खूण केली. यावर आमदार म्हणाले, सांगू दे माझी माणस आहेत त्यांना मनमोकळे काम करायचे आहे. त्यांना सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे.

पुढे ते म्हणाले, ती गोष्ट झाली, त्यानंतर सरकार बदललं. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, रविंद्र चव्हाण यांचा फोन आला सरकारला समर्थन हवं आहे. त्यावेळेस आमचे प्रमुख राज ठाकरे यांना विचारले म्हणून सरकारला समर्थन दिले. विधान परिषद, राज्य सभा, अध्यक्ष पदाची निवडणूक, राष्ट्रपती पदाच्या निवडणूकित समर्थन दिले. त्यामुळे हे कोणी आम्हाला विचारलं आमच्या साहेबांना विचारलं त्यांना समर्थन दिले.

कोत्या मनाच्यांना जमलं नाही

पुढे बोलताना म्हणाले, जे कोत्या मनाचे आहेत, त्यांना ते जमलं नाही साहेबांना विचारणे. त्यांना त्यात कमीपणा वाटला, आमचं काय चुकलं त्यात. राज ठाकरे हे मोठ्या मनाचे दिलदार व्यक्तिमत्व आहे. राजकारणात सर्व पक्ष त्यांचे मित्र आहेत. त्यांना समोरच्यांनी विचारलंच नाही तर सांगणार काय ? याआधी पाच वेळा व आताची सहावी वेळ आम्ही यांना समर्थन देत आहोत. त्यामुळे कोणी असं समजायची गरज नाही की मनसेने त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला.

खरं इंजिन आमचे

दरम्यान पाटील यांनी व्यासपीठावर उपस्थित महायुतीच्या नेत्यांना चिमटा काढत म्हणाले की, हे बोलायचे ट्रिपल इंजिनच सरकार आहे, परंतु खर इंजिन आमचं आहे.. असे राजू पाटील म्हणताच प्रेक्षागृहात एकच हशा पिकला. व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना देखील हसू आवरणे जमले नाही.

पाटील म्हणाले इंजिन लागल्यामुळे गाडी नक्कीच स्पीड पकडेल. श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा हॅट्रिक मारतील, संसदेत जातील. माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना की त्यांनी मंत्री व्हावे.

व्यासपीठावर पाठी असलेल्या स्क्रीनवर महायुतीतील पक्षांची चिन्हे होती. या चिन्हांत मनसेच्या इंजिनला पहिले स्थान देण्यात आल्याने त्याची कुजबुज प्रेक्षागृहात सुरू होती.

त्यांनी काम केलीत निश्चित माझ्या नॉलेज मधील काम आहेत. त्यांना जशी हनुमान चालिसा पाठ आहे तशा समस्या पण पाठ आहेत. त्यांचं कौतुक आहे पण काही मागण्या आमच्या पण आहेत बाळकुम गायमुख कोस्टल रोड आमच्या कोपर पर्यत आणा. रेतीबंदर पर्यत तो रोड झाला तर डोंबिवली पश्चिमेतील माणूस 5 मिनिटांत मुंब्रा जाईल. एम्सच्या धर्तीवर आरोग्य सुविधा आणा. अनेक गुरचरण च्या जागा आहेत त्या अशाच कोणाच्या घशात जाण्यापेक्षा तेथे सोयी सुविधा आल्या तर या भागाचा चांगला विकास होईल असे पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com