अनोखा ‘अटल बंधन‘ राखीपोर्णिमा सोहळा

Rakshbandhan celebration in dombivali
Rakshbandhan celebration in dombivali

डोंबिवली- झपाट्याने होणाऱ्या नागरिकरणामुळे सर्वच नागरी सुविधांवर प्रचंड ताण आला आहे, त्यामुळे अचानक बदल घडणार नसला तरी भाजप सरकार केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी भविष्यकाळात होणाऱ्या नागरिकरणाचा अभ्यास करुन निधी उपलब्ध करुन देणार आहे. यातूनच विविध योजना राबवून याभागातील पाणीपुरवठा, रस्ते, सांडपाणी, आरोग्य अशा समस्या सुटतील, असे प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री व स्थानिक आमदार रविंद्र चव्हाण यांनी लोढा वसाहत देसलेपाडा येथे कल्याण ग्रामीण भाजपा तर्फे आयोजित ‘अटल बंधन’ या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर उपस्थित महिलावर्गासमोर मार्गदर्शन करताना केले.

रविवारी भाजप कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदिप माळी यांनी दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन केले होते. या उत्सवात परिसरातील हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, याभागात विशेषतः पिण्याच्या पाण्याची समस्या आहे आता नविन टाक्या बांधून नियोजन करण्यात येणार आहे. परंतू, अशा सर्व समस्या सोडविण्यासाठी धाव घेणारे संदिप माळी यांनी प्रसंगी स्वखर्चाने महिला भगिनिंना पिण्याचे पाणी टँकरने पुरविले त्यामुळे येथील लोकांशी त्यांचे असलेले अतूट नाते आपल्या मोठ्या उपस्थितीतून जाणवते.

या कार्यक्रमाची सुरुवात स्थानिक नगरसेविका रविना माळी यांनी मानपाडा पोलीस स्टेशन मधील पोलिसांना आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना राखी बांधून केली.
या कार्यक्रमातून दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेजी यांना श्रद्धांजली वाहून या उत्सवाचे नाव ‘अटलबंधन ‘असे समर्पक ठेवण्यात आले.

उपस्थित सर्व महिलांना माळी बंधू तर्फे रक्षाबंधनाची भेट म्हणून प्रत्येकी स्टीलची भांडी, धान्य व साडी अशी भेट देण्यात आली. भोपर, देसलेपाडा, लोढा हेरिटेज या परिसरातील हजारो महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती. सदर सोहळ्याला मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनि गजानन काब्दुले, भाजप सरचिटणीस शिवाजी आव्हाड, नगरसेविका रविना माळी, डॉ. सुनीता पाटिल, नगरसेवक केडीएमटी सदस्य मनोज चौधरी व भाजपचे अनेक पदाधिकारी हजर होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com