नवी मुंबई शहरात रामनामाचा गजर  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

नवी मुंबई - शिर्डीत रामनवमीच्या दिवशी मोठा उत्सव केला जातो. याच पार्श्‍वभूमीवर शहरातील राम मंदिरांबरोबरच साईबाबा मंदिरांतही रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. करावे गावातील साई वाडीमधील साईबाबा मंदिरातही रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी कीर्तन झाल्यावर रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. महिलांनी या वेळी पाळणा म्हटला. दर्शनासाठी मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. 

कोपरी गावातील राम मंदिर व हनुमान मंदिरातही रामनवमीनिमित्त धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. लहान मुलाच्या नामकरण समारंभाप्रमाणे राम जन्मोत्सवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. बेलापूर गावातील राम मंदिरातही मोठा उत्सव साजरा करण्यात आला. मंदिरात धार्मिक कार्यक्रम झाले.

तुर्भ्यात रामनवमी उत्साहात साजरी
तुर्भे  - श्री विश्वनाथ कृष्णाजी सामंत ट्रस्टतर्फे तुर्भे येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यात मंगळवारी (ता. ४) सकाळी रामनवमीनिमित्त तुर्भे येथील शांता महिला मंडळाचे श्री रामतनु चरित्रायन, त्यानंतर कलावती आई भगिनी भजन मंडळाचे भजन व श्री विठ्ठल प्रासादिक भजन मंडळाचे भजन झाले.

रामतनुमातेच्या आनंद भुवन मंदिरातील या उत्सवात शनिवारी (ता. १) सायंकाळी ४ ते ६ दरम्यान वाशीतील चिन्मय मिशन भजन मंडळाचे भजन झाले. रामनवमीला सकाळी ११ ते १२.३० श्री रामजन्माचे ह.भ.प. मीरा प्र. फणसेकर यांचे कीर्तन झाले. दुपारी ३ ते ४.३० या वेळेत महादेवबुवा शहाबाजकर यांच्या श्री गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळाचे, सायंकाळी ४.३० ते ६.०० शिवप्रासादिक भजन मंडळ आणि सायंकाळी ६ ते ७.३० श्री विठ्ठल प्रासादिक भजन मंडळाचे भजन झाले. त्यांनतर रात्री श्रीरामाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. तुर्भे येथील रामनवमी उत्सवाचे आयोजन सद्गुरू बाळकृष्ण महाराजाच्या प्रेरणेने विश्वनाथ कृष्णाजी सामंत ट्रस्ट व तुर्भे ग्रामस्थांच्या वतीने दर वर्षी करण्यात येते. 

Web Title: Ram navami celebration in new mumbai