ठाणे : स्थायी समिती सभापतिपदी राम रेपाळे

Ram Repale Elected Chairperson Standing Committee Thane Corporation
Ram Repale Elected Chairperson Standing Committee Thane Corporation

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासहित सर्व विषय समित्यांच्या सभापती पदांची निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी काम पाहिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 समीर उन्हाळे उपस्थित होते. आजच्या या निवडणुकीत स्थायी समिती सभापतीपदी राम रेपाळे हे बिनविरोध निवडून आले.

महापालिकेतील कै. अरविंद पेंडसे सभागृहात पार पडलेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत राम रेपाळे हे स्थायी समिती सभापतिपदी निवडून आले. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पाच विशेष समित्यांची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिक्षण समिती सभापतिपदी विकास रेपाळे, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी जयश्री डेव्हिड, क्रीडा व समाजकल्याण व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती अमर ब्रह्मा पाटील, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापतिपदी मंगल कळंबे, आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती सभापती केवलादेवी रामनयन यादव हे निवडून आले आहेत.

यावेळी महापौर मिनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सर्वाचे अभिनंदन केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com