(म्हणे) मोदी सरकारकडून राम मंदिराचे काम सुरू!

Ram-mandir-Work
Ram-mandir-Work

मुंबई - समाजमाध्यमांतील सध्याची नवी अफवा आहे ती राम मंदिराचे काम सुरू झाल्याची. ही बातमी दिली आहे ‘इन्स्टंटएफबीन्यूज डॉट कॉम’ने आणि पसरविण्याचे काम केले ‘आय सपोर्ट मोदीजी’ या फेसबुक पेजने. सर्वोच्च न्यायालय राम मंदिराबाबत निर्णयच देत नसल्याने अखेर खुद्द पंतप्रधान मोदीजी यांनी आपला घटनात्मक अधिकार वापरला आणि राम मंदिर बांधण्याचे काम सुरू केले, असे त्या बातमीत म्हटले आहे.

अर्थातच ती बातमी खोटी आहे. राम मंदिर जन्मभूमीच्या जागेबाबतचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देत नाही, तोवर त्या जागेवर राम मंदिराची उभारणी करता येणार नाही. परंतु, पंतप्रधान मोदी हे राम मंदिर उभारणीसाठी प्रयत्नशील आहेत, हे भाजपचे प्रेमी आणि मोदींचे भक्त यांच्या मनावर ठसविण्यासाठीच हे खोटे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. त्यातील राम मंदिर उभारणीबाबतचा दावा सपशेल चुकीचा आणि भ्रम निर्माण करणारा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com