टोलेबाजी, सामना संपादकपदावरून रामदास आठवले म्हणतात...

टोलेबाजी, सामना संपादकपदावरून रामदास आठवले म्हणतात...

मुंबई : RPI चे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे आपल्या मिश्किल बोलण्यामुळे सतत चर्चेत असतात. मात्र आता रामदास आठवलेंनी थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवनसेनेचे खासदार "संजय राऊत यांना किमान 'सामना'चं संपादकपद तरी द्यायला हवं होतं" असा खोचक टोला रामदास आठवले यांनी शिवसेनेला लगावला आहे. 

य म्हणाले रामदास आठवले:  

शिवनसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' या वृत्तपत्राचं संपादकपद आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडे होतं. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संपादकपद सोडलं होतं. यानंतर ही धुरा शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांच्याकडे आलं. मात्र आता सामनाचं संपादकपद रश्मी ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केलं गेलंय. यावर रामदास आठवलेंनी निशाणा साधलाय. "ज्या संजय राऊतांमुळे महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या संजय राऊत यांना किमान  'सामना'चं संपादकपद तरी द्यायचं" असं रामदास आठवलेंनी म्हंटलंय. 

दंगलीसाठी आम्ही जवाबदार नाही 

"केंद्रात आमचं सरकार आहे मात्र दंगलीसाठी आम्ही जवाबदार असल्याचा प्रश्नच येत नाही. दिल्लीत घडलेल्या हिंसचाराला काँग्रेस आणि आम आदमी पक्षच जवाबदार आहेत. त्यांनी ठरवलं असतं तर ही दंगल थांबू शकली असती. मात्र आपच्या नगरसेवकानं  ही दंगल भडकवली आणि काँग्रेसनं ती दंगल अधिक तीव्र करण्यात मदत केली ", असा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे.

महायुतीला काहीही फरक पडणार नाही 

"मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जर प्रांतवादाची भूमिका सोडली तर त्यांचं महायुतीत स्वागत आहे. मात्र  त्यांच्या येण्यामुळे अथवा न येण्यामुळे महायुतीला काहीही फरक पडणार नाही", असंही रामदास आठवले यांनी म्हंटलंय. 

मुंबईचा महापौर महायुतीचाच: 

"येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत आमचा पक्ष पूर्ण ताकदीने भाजपसोबत राहून शिवसेनेला पराभूत करणार आहे. २०२२ मध्ये मुंबईचा महापौर भाजपचाच असणार आहे,रिपाइंचा मेळावा लवकरच होणार आहे, तसंच नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत  RPI ला  ५-६ जागा हव्या आहेत. इथेही महायुतीचाच महापौर असेल. औरंगाबाद महापालिकेची निवडणूकही आम्ही लढणार आणि इथेही महायुतीची सत्ता असेल", असा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला आहे.

ramdaas aathvale criticizes shivsena and taunts sanjay raut over editor post of saamna

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com