Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

उल्हासनगर जिल्हातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) गटाच्या महिला मेळाव्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते.
Ramdas Athawale  appeal to elect Srikant Shinde in the Lok Sabha elections 2024 political news
Ramdas Athawale appeal to elect Srikant Shinde in the Lok Sabha elections 2024 political news

उल्हासनगर : जो देशाचा दुश्मन तोच आमचा दुश्मन आहे, असे स्पष्ट करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्षम नेतृत्व पुन्हा देशाला मिळण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना लोकसभेत पाठवणे गरजेचे असून त्यांना मतदान करा असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी रात्री उल्हासनगरातील महिला मेळाव्यात केले.

दलित वस्ती विकास निधीसाठी 25 कोटी द्या, ज्या दलित वस्ती हरित पट्ट्यातून वगळल्या गेल्या आहेत. त्या झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न करावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी केली. शिवसेनेच्या प्रभागासाठी निधी देता तसा आम्हाला पण द्या, असा चिमटाही भालेराव यांनी काढला.

याला उत्तर देताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की दलित वस्ती आणि नगरोथान निधीच्या माध्यमातून 50 कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती भाषणा दरम्यान दिली. तसेच निधी देताना गरिबाला देतोय की श्रीमंताला हे मी बघत नाही, फक्त शहराचा आणि वस्त्यांचा विकास झाला पाहिजे हाच हेतू ठेवतो, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

उल्हासनगर जिल्हातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) गटाच्या महिला मेळाव्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महायुतीचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे, भाजप आमदार कुमार आयलानी,रिपब्लीकन पार्टीचे नेते,गौतम सोनावणे,सुरेश बारासिंगे,अण्णा रोकडे,शिवसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी,प्रवक्ते किरण सोनावणे,उपजिल्हाप्रमुख दिलीप गायकवाड,युवासेना कल्याण जिल्हा सचिव विक्की भुल्लर,भाजपचे प्रकाश नाथानी,कपिल अडसूळ,मनिष हिंगोराणी आदी मान्यवर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com