esakal | डोंबिवली बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबाला म्हाडाचे घर द्या - रामदास आठवले | Ramdas Athawale
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas Athwale

डोंबिवली बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबाला म्हाडाचे घर द्या - रामदास आठवले

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई : डोंबिवली (Dombivali) मधील सामूहिक बलात्कारातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी भेट घेऊन रिपब्लिकन पक्षातर्फे (RPI) 1 लाख रुपयांची सांत्वनपर मदत दिली. डोंबिवली मानपाडा पोलीस स्टेशन (manpada police) येथे ही भेट झाली. यावेळी अत्याचार पीडित मुलीचे आई वडिलांच्या हाती चेक देण्यात आला. अत्याचार पीडित मुलीच्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याने राज्य सरकारने (mva government) पीडित मुलीच्या कुटुंबियांना म्हाडातर्फे घर (mhada home) देऊन सुरक्षितस्थळी पुनर्वसन करावे, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

हेही वाचा: कल्याण : हातभट्टीवरील 300 लिटर गावठी दारू जप्त; एकाला अटक

मुंबईत साकिनाका येथे अत्याचाराची घटना घडल्या नंतर त्यातील पीडितेच्या परिवाराला मुख्यमंत्र्यांनी 20 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्या प्रमाणे डोंबिवलीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला राज्य सरकार ने 20 लाखांची सांत्वनपर मदत देण्याची मागणी आठवले यांनी केली. डोंबिवली सामूहिक अत्याचाराचा खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी आठवले यांनी यावेळी केली. डोंबिवली बलात्कार प्रकरणात पोलिसांनी 33 आरोपीना अटक केली. एव्हढ्या मोठ्या प्रमाणात आरोपी असण्याचा हा प्रकार देशात पाहिल्यांदाच घडला असल्याचे आठवले म्हणाले.

loading image
go to top