Mumbai News: माजी आमदार रमेश कदम यांच्याविरोधातील खटल्याचा लवकरच फैसला

ramesh kadam anna bhau sathe corporation corruption case
Mumbai News: माजी आमदार रमेश कदम यांच्याविरोधातील खटल्याचा लवकरच फैसला

अण्णा भाऊ साठे महामंडळ गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत असताना आर्थर रोड कारागृहाच्या अधीक्षकांना व डॉक्टरला शिवीगाळ आणि धमकी दिल्या प्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांच्या विरोधात सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावर लवकरच फैसला होणार आहे.

माजी आमदार रमेश कदम हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना त्यांनी बोगस लाभार्थी दाखवून शेकडो कोटींचा घोटाळा केला.

Mumbai News: माजी आमदार रमेश कदम यांच्याविरोधातील खटल्याचा लवकरच फैसला
Ramesh Kadam : माजी आमदार रमेश कदम यांच्या सुटके मुळे मोहोळ तालुक्यातील राजकीय गणिते बदलणार...

या प्रकरणी रमेश कदमांसह एकूण १२ जणांना अटक करण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने त्यांना या प्रकरणी पक्षातून निलंबित देखील केले. आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असताना कदम यांनी २४ फेब्रुवारी २०१६ रोजी तुरुंग अधीक्षक आणि डॉक्टरला शिवीगाळ केली होती.

जे जे रुग्णालयात जाण्यासाठी गाडी उपलब्ध नसल्याने शिवीगाळ केल्याचा कदम यांच्यावर आरोप असून एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Mumbai News: माजी आमदार रमेश कदम यांच्याविरोधातील खटल्याचा लवकरच फैसला
माजी आमदार रमेश कदम यांना जामीन मंजूर

मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात या खटल्यावर न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या समोर सध्या सुनावणी सुरू असून सोमवारी खटल्यात सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी रमेश कदम यांची फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३१३ अंतर्गत साक्ष तपासली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com