दिशा सालियान प्रकरण : राणे पिता-पुत्र मालवणी पोलीस ठाण्यात हजर

भाजप कार्यकर्ते राणे समर्थकांची पोलीस स्टेशनबाहेर घोषणाबाजी
दिशा सालियान प्रकरण : राणे पिता-पुत्र मालवणी पोलीस ठाण्यात हजर

मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. मालवणी पोलिसांनी राणे पिता-पुत्रांना दिशा सालियान (Disha Salian) प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. दरम्यान, मालवणी पोलीस ठाण्याबाहेर भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. (Rane father and son present at Malvani police station for interrogation)

दिशा सालियान प्रकरण : राणे पिता-पुत्र मालवणी पोलीस ठाण्यात हजर
"महाराष्ट्राला कर्तृत्ववान राज्यपालांचा वारसा, कोश्यारींवर न बोललेलं बरं"

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची कथित मॅनेजर असलेल्या दिशा सालीयान हीच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह आरोप राणे पिता-पुत्रांनी केला होता. त्यानंतर दिशा सालीयानच्या आई आणि वडिलांनी राज्य महिला आयोगाकडे आपला मुलीची बदनामी झाल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. यानंतर मालवणी पोलिसांनी राणे पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल केला होता, तसेच त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. दरम्यान, नितेश राणेंना ३ मार्च तर नारायण राणेंना ४ मार्च रोजी पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. पण त्यांनी वेळ वाढवून मागितला होता. त्यानंतर आज राणे पिता-पुत्र पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.

काय म्हणाले होते राणे?

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत दिशा सालियान मृत्यूप्रकरणात गंभीर आरोप केले होते. दिशा सालियानची आत्महत्या नव्हे तर हत्याचा झाल्याचा आरोप करताना आक्षेपार्ह आरोप राणेंनी केले होते. त्यानंतर दिशाचं मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहून दिशाची बदनामी केली जात असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर महिला आयोगानं पोलिसांनी या प्रकरणी चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com