बलात्कार प्रकरणातील आरोपी 21 वर्षांनी दोषी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

मुंबई - बलात्काराच्या आरोपातून 21 वर्षांपूर्वी सत्र न्यायालयाने मुक्तता केलेल्या 41 वर्षांच्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने दोषी ठरविले आहे.

मुंबई - बलात्काराच्या आरोपातून 21 वर्षांपूर्वी सत्र न्यायालयाने मुक्तता केलेल्या 41 वर्षांच्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने दोषी ठरविले आहे.

आरोपातून सुटका झाली त्या वेळी आरोपी 19 वर्षांचा होता. डिसेंबर 1996 मध्ये ही घटना घडली होती. त्या वेळी पीडित मुलीचे वय 11 वर्षे होते; मात्र ते 16 असल्याचे कनिष्ठ न्यायालयाने नमूद केले आणि या कारणावरून आरोपी मच्छिंद्र सोनावणेची सुटका करण्यात आली होती. 21 वर्षांपूर्वी सज्ञान असण्याचे वय 16 होते. त्यामुळे त्या वेळी आरोपी आणि पीडित तरुणीत सहमतीने संबंध आले, असे गृहितक कनिष्ठ न्यायालयाने नोंदविले होते. जुलै 1997 मध्ये आरोपीची यातून सुटका करण्यात आली होती; मात्र न्या. इंद्रजित महंती आणि न्या. व्ही. के. जाधव यांच्या खंडपीठाने हा निकाल रद्दबातल ठरवला.

Web Title: Rape Case Accused Crime Punishment High Court