नौदल कर्मचाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

मुंबईत तरुणीच्या तक्रारीवरून भारतीय नौदलात कार्यरत असलेल्या अभियंत्यावर कफ परेड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

नौदल कर्मचाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

मुंबई - मुंबईत तरुणीच्या तक्रारीवरून भारतीय नौदलात कार्यरत असलेल्या अभियंत्यावर कफ परेड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी आणि आरोपी दोघेही एकमेकांना परिचित असून कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात पिडीत तरुणी एका खाजगी महाविद्यालयात शिकते आणि दक्षिण मुंबईतील नेव्ही नगर परिसरातील वसतिगृहात वास्तव्यास आहे. पिडीत तरुणीने या प्रकरणी परेड पोलीसाना 11 ऑक्टोबर मंगळवारी तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार रविवारी 9 ऑक्टोबर रोजी दुपारी पिडीत तरुणी तिच्या वडिलांच्या मित्राला भेटण्यासाठी नेव्ही नगरला गेली होती. नेव्हीनगर येथे 29 वर्षीय कार्यरत असलेल्या नौदलात मित्राशी तिची भेट झाली. भेटीदरम्यान आरोपी मित्राने पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीने तरुणीला कोणासमोर या घटनेबद्दल वाच्छता न करण्याची धमकी दिली.

तसेच तरुणीने असे केल्यास तिची प्रतिमा खराब होईल असा सल्ला आरोपीने दिला. मात्र, पिडीत तरुणी वसतिगृहात पोहोचल्यानंतर तिने वसतिगृह प्रभारी आणि पालकांना सर्व हकीकत सांगितली. पिडीत तरुणी 2020 पासून आरोपीला ओळखत असून लॉकडाऊन दरम्यान दोघांची मैत्री झाली. दोघांमध्ये नंबर्सची देवाणघेवाण झाली .पीडित तरुणी ऑगस्ट 2022 पासून नेव्ही नगरमध्ये राहू लागली आणि आरोपीही त्याच परिसरात कामाच्या निमित्ताने वास्तव्यास आला. कफ परेड पोलिसांकडून कलम 376 अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.