मुंबईत बलात्काराच्या घटनांत वाढ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

मुंबई - मुंबईत काही वर्षांत बलात्काराच्या घटनांत वाढ झाली असून, 2013 च्या तुलनेत 2018 हे प्रमाण दुपटीने वाढले आहे. मागील पाच वर्षांत 842 अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचे समोर आले. महिलांवरील लैंगिक अत्याचारांचे गुन्हे वाढले असले, तरी गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते शकील शेख यांना मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीत हा तपशील उघड झाला आहे. मुंबईत 2013 ते 2018 पर्यंत बलात्काराच्या 3817 गुन्ह्यांची नोंद झाली. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांतही वाढ झाली आहे. या काळात एकूण 842 अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद मुंबई पोलिसांनी केली आहे. दरम्यान, सप्टेंबर 2017 पूर्वीचा तपशील संगणक कक्षाकडे उपलब्ध नसल्याची माहिती देण्यात आली आहे. महिलांवर अत्याचार होऊ नये, याची खबरदारी घेतली जात आहे, असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले.

मुंबईतील बलात्काराचे गुन्हे
2013 : 388
2014 : 605
2015 : 710
2016 : 712
2017 : 751
2018 (सप्टेंबरपर्यंत) : 651

Web Title: Rape Case Increase in Mumbai