बलात्कारप्रकरणी पतीला अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

मुंबई - कौटुंबिक वादातून पत्नीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पतीला वांद्रे पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

मुंबई - कौटुंबिक वादातून पत्नीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या पतीला वांद्रे पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

पीडित महिला ही वांद्रे परिसरात राहते. 13 वर्षांपूर्वी त्या दोघांचा विवाह झाला होता. त्यांचा मुलगा पुण्यात शिक्षण घेतो. पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्यावरून रोजच भांडणे होत असत. गतवर्षी पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. मार्चमध्ये घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी पतीने तिला वांद्रे न्यायालय परिसरात आणले. तिने न्यायालयात जाण्यास नकार देताच तिला विरार येथे घेऊन जात मारहाण करून तिच्याकडून जबरदस्तीने घटस्फोटांच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या. त्यानंतर पतीने तिच्यावर बलात्कार केल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकाराची तिने वांद्रे पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावरून गुरुवारी (ता. 19) वांद्रे पोलिसांनी अटक केली. पोलिस त्याची चौकशी करत आहेत.

Web Title: rape by husband crime