शीघ्र कृती दलातील जवानाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

पनवेल : तळोजा येथील शीघ्र कृती दलातील सुनील भोये (३५) या जवानाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. ३१) सकाळी उघडकीस आली. या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी कौटुंबिक कारणावरून त्याने आत्महत्या केली असण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेतील मृत सुनील भोये हे तळोजा येथील शीघ्र कृती दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. ते आरएएफमधील क्वॉर्टर्समध्ये पत्नीसह वास्तव्यास होते. गुरुवारी पहाटे पत्नी झोपेत असताना सुनील भोये यांनी हॉलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

पत्नीला जाग आल्यावर पतीने आत्महत्या केल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे आरएएफच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rapid Action force Jawan Suicide