ठाणेकरांनो...! विनाकारण रस्त्यावर फिरण्याआधी ही बातमी वाचाच, अन्यथा...

thane
thane

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात पोलीस आणि राज्य राखीव बल (एसआरपीएफ) तैनात करूनही नागरिकांची वर्दळ कमी होत नसल्याने वागळे (झोन-1) आणि कळवा- मुंब्रा (झोन-5) परिमंडळात पोलिसांच्या मदतीला आता ‘रॅपिड अॅक्शन फोर्स’ तैनात करण्यात येणार आहे. रॅपिड अॅक्शन फोर्सच्या 120 जवानांना दोन गटात विभागून कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

ठाणे शहरात कोरोनाचा कहर वाढत असताना देखील नागरिक योग्य ती खबरदारी न घेता विनाकारण बाहेर फिरताना दिसत आहेत. अशांना आवर घालण्यासाठी पालिकेने 600 कोविड योद्धांची नेमणुक केली असून पोलीसही अहोरात्र कार्य करत आहेत. त्यांच्या मदतीला एप्रिल अखेरीस कळवा- मुंब्रा येथे राज्य राखील पोलिस बलाची 100 जणांची तुकडी (एसआरपीएफ) देखील तैनात करण्यात आली.

त्यानंतर ही नागरिक योग्य ते पालन करत नसल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर सरकारने प्रत्येकी 60 जवानांची रॅपिड अॅक्शन फोर्सची तुकडी वागळे इस्टेट परिमंडळ - 5 आणि कळवा-मुंब्रा परिमंडळ -1 मध्ये तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Rapid Action Force to take to the streets in Thane, read full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com