
मुंबई : राज्य शासनाने कोणत्याही बाईक ॲपला अद्यापि अधिकृत परवानगी दिलेली नसताना अवैधरित्या अँपद्वारे आरक्षण करून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या रॅपिडो बाईकला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रंगेहात पकडले. मात्र तरीही रॅपीडो बाईक टॅक्सी सुरु होती याबाबतचे वृत्त ७ जुलै रोजी सकाळ मध्ये मुंबईत रॅपिडो बाईक टॅक्सी सुरूच या मथळ्याखाली प्रकाशित करण्यात आले होते. ८ जुलै रोजी ऍप मधून बाईक टॅक्सी सेवा बंद करण्यात आली आहे .