

Loggerhead Turtle Rescue
ESakal
मुंबई : अरबी समुद्रात संकटात सापडलेल्या सुमारे १०० किलो वजनाच्या दुर्मिळ 'लॉगरहेड' सागरी कासवाची यलो गेट पोलिसांच्या सागरी गस्त पथकाने आणि 'रॉ' या वन्यजीव संस्थेने रविवारी सुटका केली. कासवाला उपचारांसाठी डहाणू येथील 'सी टर्टल ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटर'मध्ये हलविण्यात आले आहे.