दुर्मिळ मासा मुंबई बंदरात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

गेल्या वर्षी "सनफिश' सापडला होता. बाजारात त्याला किमत मिळत नसल्याने त्यावेळी तो "ससून डॉक' बंदरात टाकण्यात आला होता. परंतु या वेळी ऑल इंडिया पर्ससीननेट असोशिएशनचे अध्यक्ष गणेश नाखवा यांनी या माशाचे महत्त्व ओळखल्याने त्याचे जतन होणार आहे. 

मुंबई : काही दिवसांपुर्वी मुंबईच्या समुद्रात दुर्मिळ "सनफिश' मासा सापडला होता. समुद्राच्या तळाशी राहणाऱ्या या जीवाचे आता "छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रालयात' जतन करण्यात येत आहे. 
गेल्या वर्षी "सनफिश' सापडला होता. बाजारात त्याला किमत मिळत नसल्याने त्यावेळी तो "ससून डॉक' बंदरात टाकण्यात आला होता. परंतु या वेळी ऑल इंडिया पर्ससीननेट असोशिएशनचे अध्यक्ष गणेश नाखवा यांनी या माशाचे महत्त्व ओळखल्याने त्याचे जतन होणार आहे. 

समुद्राच्या तळाला राहणारा हा जीव क्वचितच पुष्ठभागावर येतो. त्यामुळे त्याचे दर्शन दुर्मीळ असते. आपल्या देशात त्याचा फारसा अभ्यासही झाला नाही. आता "छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया'त त्याचे जतन करण्यात येणार आहे. त्यामुळे तो जिज्ञासूंना पाहणे शक्‍य होणार आहे. हा जीव 3 फुट लांब आणि 30 किलो वजनाचा आहे. 

याबाबत नाखवा यांनी सांगितले की, समुद्रातील जीव खूपच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न आवश्‍यक आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rare "sunfish" was found in the sea of ​​Mumbai.