Mumbai: रुग्णाच्या नाश्‍त्यात उंदराची विष्ठा! तक्रारीनंतरही कारवाई नाही; पालिकेच्या रुग्णालयात संतापजनक प्रकार

BMC Hospital:महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे.सकाळच्या नाश्‍त्यामध्ये उंदराची विष्ठा आढळल्याचा प्रकार घडला असून याबाबत कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे
Rat droppings found in breakfast  at bmc hospital

bmc hospital Rat droppings found in breakfast

Esakal

Updated on

मुंबई : महापालिकेच्या कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात (शताब्दी रुग्णालय) प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या एका महिलेला दिलेल्या सकाळच्या नाश्‍त्यामध्ये उंदराची विष्ठा आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही बाब रुग्ण व तिच्या नातेवाइकांनी तत्काळ कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली असतानाही, कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. दरम्यान, अधीक्षक डॉ. अजय गुप्ता यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com