

RAT IN GULAB JAMUN SYRUP
ESakal
ठाणे : जेवणात उंदीर, पाल, झुरळं, किडे सापडल्याच्या घटना सातत्याने समोर येतात. असाच एक खळबळजनक प्रकार ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. एका मिठाईच्या दुकानात मोठ्या भांड्यात ठेवलेल्या गुलाबजामच्या पाकात उंदीर तरंगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली आहे.