रतन टाटांचं प्राणीप्रेम! जखमी पाळीव कुत्र्यावर केले उपचार; त्याच्या मालकाशी संपर्क साधण्यासाठी...

Ratan Tata
Ratan Tata

Ratan Tata: टाटा समूहाचा १५५ वर्षांचा वारसा पुढे नेणारे रतन टाटा आज जगात एक यशस्वी उद्योगपती म्हणून ओळखले जातात. रतन टाटा यांनी देखील एक कर्मचारी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने ट्रिलियन डॉलरचा व्यवसाय निर्माण केला.

रतन टाटा फक्त व्यवसायात नाही तर सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असतात. त्यांनी अनेक सामाजिक संस्था स्थापन केल्या आहे. कामगार, प्राणी यांच्यावर त्यांचे विशेष प्रेम असते. नुकताच महाराष्ट्र सरकारने त्यांचा उद्योगरत्न पुरस्कार देऊन गौरव केला.

दरम्यान रतन टाटा आता चर्चेत येण्याची कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल. रतन टाटा यांचं प्राणीप्रेम जगजाहीर आहे. रतन टाटा यांच्या ऑफिस स्टाफला सायन हॉस्पिटल मुंबई येथे काल रात्री एक हरवेला कुत्रा सापडला. यावेळी त्यांनी त्या कुत्र्याला जवळ घेतले. तो कुत्रा जखमी अवस्थेत होता. त्या कुत्र्यावर आता उपचार सुरु आहेत. आम्ही त्याची काळजी घेत असल्याचे रतन टाटा यांनी सांगितले.

Ratan Tata
Rohit Pawar: रोहित पवारांना धक्का! रात्री २ वाजता नोटीस देऊन बारामती ॲग्रोचे दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश

दरम्यान, तो आमच्या काळजीत आहे आणि त्याच्या जखमांवर सुरू आहेत. तुम्ही कुत्र्याचे मालक असल्यास किंवा काही माहिती असल्यास कृपया काही पुराव्यासह reportlostdog@gmail.com वर ईमेल करा, असे आवाहन रतन टाटा यांनी केले आहे.

Ratan Tata
तरुण देश म्हणून जगामध्ये ओळख निर्माण करणाऱ्या भारतासाठी धोक्याची घंटा! २०५० पर्यंत...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com