रतन टाटा यांना न्यायालयाचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

उद्योगपती रतन टाटा यांच्यासह टाटा समूहाच्या नऊ संचालकांना आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. उद्योगपती नस्ली वाडिया यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या फौजदारी खटल्याची कारवाई न्यायालयाने रद्दबातल ठरवली. रतन टाटा यांच्यासह टाटा समूहाचे विद्यमान अध्यक्ष एन. चंद्रशेखरन व अन्य आठ संचालकांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती.

मुंबई - उद्योगपती रतन टाटा यांच्यासह टाटा समूहाच्या नऊ संचालकांना आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. उद्योगपती नस्ली वाडिया यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या फौजदारी खटल्याची कारवाई न्यायालयाने रद्दबातल ठरवली. रतन टाटा यांच्यासह टाटा समूहाचे विद्यमान अध्यक्ष एन. चंद्रशेखरन व अन्य आठ संचालकांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. 

टाटा समूहात स्वतंत्र संचालक पदावर असलेले नस्ली वाडिया यांनी डिसेंबर २०१७ मध्ये फौजदारी फिर्याद दाखल केली होती. विशेष सर्वसाधारण सभेत भागधारकांनी मतदान करून वाडिया यांना हटवले होते. याबाबत त्यांनी संचालक मंडळाकडे खुलासा मागितला होता. मिळालेल्या खुलाशाबाबत असमाधान व्यक्त करत त्यांनी दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratan Tata HIgh Court